Ahmednagar Breaking : अहमदनगर मधील मिरावली पहाडावर राडा झाला असल्याचे वृत्त आहे. येथे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एकास मारहाण केली आहे. भिंगार येथील रिक्षाचालक शेख आवेझ बिलाल असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तर पाप्या नामक युवक व त्यासोबत असणाऱ्या दांडके, तलवारी घेऊन आलेल्या आठ ते दहा जणांनी मारहाण केल्याचे शेख आवेझ बिलाल याने म्हटले आहे. शेख आवेझ बिलाल हा बुऱ्हानगर येथील मिरावली पहाडावर प्रवासी घेऊन गेलेला होता.
तेथे पाप्या नामक युवक व त्याच्यासोबत आठ ते दहा इसम आले. त्यांनी त्यास रॉड, दांडक्याने मारहाण सुरू केली. यामध्ये रिक्षाचालक शेख आवेझ बिलाल हा जखमी झाला आहे. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याला जुन्या वादाची किनार असल्याचे म्हटले जातेय.
या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते अशी माहिती समजली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात अधिक माहिती समोर येईल.
मिरावली पहाड हे बुऱ्हानगर येथे असून हे पवित्र स्थान अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध आहे. येथे दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. अशा धार्मिक स्थळी वाद झाल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. धार्मिक स्थळी अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड करावा अशी मॅगी नागरिक करत आहेत.
भिंगारसह शहरात अनेक ठिकाणी टोळीयुद्ध, टोळीकडून मारहाण आदी घटना घडत आहेत. यावरही वचक असावा यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी मागणीही होत आहे.