अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- नगर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,येथील एका कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला असून ५ जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि खंडाळा गावच्या शिवारात अक्षय कर्डिले याच्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला.
यासंदर्भात नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार जब्बाद रहिमखो पठाण यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये
यांचा समावेश आहे.
अक्षय कर्डिले याच्या मालकीचे हॉटेल राजयोग आहे, त्याठिकाणी आरोपी कुंटणखाना चालवत होते. मंगळवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नगर तालुका पोलिसांनी खंडाळा गावच्या शिवारातील हॉटेल राजयोग येथे छापा टाकला आहे.
आरोपी हॉटेल राजयोगमध्ये संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता महिला व मुलींना देह विक्री करण्यासाठी बोलवून घेत. त्या महिला व मुलींकडून गैरमार्गाने देहविक्री करून कुंटणखाना चालवत होते.
पोलिसांनी देहविक्री करणार्या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे व पाचही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल करत आहेत.