अहमदनगर ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेस काळे फासले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली.

तसेच यावेळी शेतकर्‍यांबद्दल अपशद्ब वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे,

बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, जि.प.सदस्य संदेश कार्ले, गिरिष जाधव, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, शाम नळकांडे, दत्ता जाधव, रमेश परतानी,

राजेंद्र भगत, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, दिपक खैरे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, मुन्ना भिंगारदिवे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले,

केंद्र सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करत आहे, प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. केंद्र सरकार हे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचेच निर्णय घेत आहेत.

त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे, त्यामुळे महागाईमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जनेता आर्थिक संकटात सापडली असून,

त्यांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल-डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहे. यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असे सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24