अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे.तर आता या बँकेबाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन बँकेवर निर्बंध लागू केले आहे.
६ डिसेंबर रोजी सदर आदेश जारी झाला आहे. यानुसार खातेदारांना दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असे आदेश भारतीय रिझर्व बँकेने काढले आहे.
बँकेची येणाऱ्या काळात आर्थिक प्रगती पाहून याबाबत पुढील निर्णय आरबीआय घेणार आहे. हा निर्णय आज सहा डिसेंबर पासून पुढील सहा महिन्यासाठी लागू असणार आहे.
मात्र एकूणच बँकेची येणाऱ्या काळात असणारी आर्थिक परिस्थिती आणि प्रगती पाहून आरबीआय पुढील निर्णय घेऊ शकते. त्यासंदर्भात आज आरबीआयने एक प्रेस रिलीज काढून याबाबत माहिती दिलेली आहे.
रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय खातेदार, ठेवीदारांसाठी धक्कादायक असून नूतन संचालक मंडळाने कारभार स्विकारताच वसुली व ठेवी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आता रिझर्व्ह बँकेने लावलेल्या निर्बंधांमुळे खळबळ उडाली आहे.