अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीरामपूर : धार्मिक द्वेष निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या आरोपावरून येथील मनोज चिंतामणी याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिंतामणी याने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर धार्मिक द्वेष वाढविणाऱ्या पोस्ट टाकल्या. चुकीचे संदेश प्रसारित केले. या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
ॲड. समीन अजिज बागवान (वय ३५, रा. संजय हाऊसिंग सोसायटी, वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चिंतामणी याच्याविरोधात पोलिसांनी भा. दं. वि. कलम २९५ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com