अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे,नगर दौंड रोड वरील काष्टी मध्ये आज पहाटेच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि चारचाकी गाडीची धडक होऊन या अपघाता मध्ये दौंड येथे कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे.
करांडे हे दौंड वरून आपल्या गावाकडे निघाले होते पहाटेच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रोडने जात असताना ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि चार चाकी ची धडक झाली
या धडकेत आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. या मुळे दौंड रेल्वे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.ड्युटी संपवून घरी जात असताना झालेल्या
अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या सहकार्यांना दौंड येथे कळताच अनेकांनी कष्टीला धाव घेतली होती. काही तासांपूर्वी आपल्या बरोबर असलेला
सहकारी अपघातात मृत्यू पावला याची बातमी कळल्यानंतर अनेकांना धक्का बसला असून त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होते आहे.