अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये ‘सैराट’ ! मुलीच्या नातेवाईकांनी केला मुलाचा खून

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून सैराट चित्रपटाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या जातीमधील तरूण व तरूणी एकत्र आले, प्रेम झालं अन पुढे जाऊन विवाह देखील केला.

पण मुलीच्या घरच्यांनी काही दिवस जाताच मुलाचा निर्घृण खून केला. धक्कादायक म्हणजे त्याचे प्रेतही जाळून टाकले जेणे करून काही पुरावाच राहायला नको…

ही धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील एका गावात एकमेकांच्या शेजारी राहात असलेल्या आंतरजातीय तरूण मुलाचे व शेजारीच राहाणाऱ्या मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले.

हे प्रेम आंतरजातीय असल्याने दोघांच्या कुटुंबीयांचा विरोध होणार हे त्यांना माहित होते. मात्र, प्रेमाला जात नसते. त्यामुळे त्यांनी सैराट होत दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लग्न केले.

तेथे सुखी संसार करू लागले. त्यांचे लग्न मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नसल्याने त्यांना ते सतत खटकत होते.

शेवटी मुलीच्या कुटुंबीयांनी घरातील भांडण मिटविण्याच्या बहाण्याने मुलास बोलावून घेऊन त्याचा खून केला. इतकेच नव्हे तर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळूनही टाकला.

आरोपींना अटक केल्याचे वृत्त समजले आहे. आता ही घटना समोर आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये हकनाक तरुणाचा जीव गेला आहे. समाज आज प्रगत झाल्याच्या गप्पा मारतो , प्रगतीचा व देखील आणतो

परंतु आजही समाजातील जातीय व्यवस्था संपलेली नाही हेच वास्तव असल्याचे या घटनेतून दिसते. या खून प्रकरणामुळे सदर मुलीचा सुखी संसार तर मोडलाच शिवाय ज्यांनी हे कृत्य केले त्यांनाही अटक झाली. शेवटी दोन्हीही कुटुंब उद्ध्वस्त होत आज उघड्यावर आल्याचे चित्र आहे.

Ahmednagarlive24 Office