अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ब्राह्मण समाजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीचेच विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर निषेध-केला.
नगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाने मिटकरींसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज तोफखाना पोलिसात दिला आहे.
त्यावर सात दिवसात आवश्यक कार्यवाहीची ग्वाही पोलिसांनी दिली. त्यानंतर ब्राह्मण सेवासंघाच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी शहरातील पटवर्धन चौकात मिटकरींचा पुतळा जाळला.
जगताप म्हणाले, सांगली येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मिटकरी यांनीकेलेल्या वक्तव्याबद्दल नगर जिल्ह्यातील ब्राह्मण समाजावतीने मी निषेध करतो.
असे भाषण वामत व्यक्त करताना कोणाचे मन व भावना दुखावून कुठेतरी समाजात तेढ निर्माणहोण्याचे प्रकार चुकीचे आहेत. चांगल्या विचारांसमवेत काम करताना चांगल्या विचारांची माणसे समवेत येत असतात.
अशावेळी वेगळ्या भावनेने त्या समाजाची चेष्टाकरणे उचित नाही. याचा कालच ब्राह्मण समाजाने निषेध केला आहे यावेळी आ. संग्राम जगतापांसह ब्राह्मण सेवा संघाचेअध्यक्ष किशोर जोशी तसेच भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, विश्व हिंदू परिषदेचे मुकुलगंधे, मनसेचे सचिन डफळ, नितीन भुतारे व अन्य उपस्थित होते.