अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : शाळेत जाणाऱ्या बहीण भावासोबत घडले असे काही झाला दुर्दैवी अंत…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

शाळेत चाललेल्या दोघा सख्या बहीण भावाचा पिकअपने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज सकाळी घडली आहे

अनुष्का गणेश शिंदे वय १६,व आदित्य गणेश शिंदे वय १४ रा निमगाव खलु,ता श्रीगोंदा अशी अपघातात मृत्यू पावलेल्या बहीण भावाची नावे आहेत

या मुलांचे वडील पेंटर काम करत असल्याची माहिती समजली असून गरीब कुटुंबातील या सख्या बहीण भावाचा असा करून अंत झाल्यामुळे निमगाव सह परिसरावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे

या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की आज सकाळी हे दोघे बहीण भाऊ दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निमगाव खलु येथून दौंडकडे जात असताना हॉटेल धनश्री समोर जुन्या टोल नाक्याजवळ एका टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात

दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकअपने या दोघा बहीण भावाना समोरून जोराची धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे या दोन्ही बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला

Ahmednagarlive24 Office