अहमदनगर बातम्या

पोटच्या मुलाने केला बापाचा खून ! अहमदनगरमधील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाविरोधात येथील राहाता पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यातील आरोपी मुलगा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मयताचे नातेवाईक अमोल विश्वनाथ साळवे (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, मयताचा मुलगा अनिल गणपत कोळगे (वय ५३) याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून वडील गणपत संभाजी कोळगे (वय ८०, रा. जाधव वस्ती, कोऱ्हाळे, ता. राहाता) यांना घराच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अनिल कोळगे हा फरार झाला आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोपानराव काकड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली.

मयत गणपत कोळगे यांचा मृतदेह लोणी येथील प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  दरम्यान, मयताचे नातेवाईक अमोल विश्वनाथ साळवे (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

आरोपी अनिल गणपत कोळगे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सोपानराव काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.

Ahmednagarlive24 Office