अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळालीप्रवरा येथे एका २२ वर्षीय तरूणाने घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
हि घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. संतोष रवींद्र वरघुडे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना संतोषच्या मावशीने पहिली. यावेळी तिने आरडाओरडा केला असता परिसरातील लोक धावत आले.
यावेळी संतोषला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मयत घोषित केले.
संतोष हा अविवाहित असून त्याच्या मागे त्याची आई, वडील भाऊ व एक बहीण आहे. संतोषने नेमके कोणत्या कारणाने आत्महत्या केली.
हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरा आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved