अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील फोटोग्राफर प्रदीप पोपट कोल्हे (वय ३५) या युवकाचा मृतदेह सोमवारी रात्री कासारवाडी शिवारातील एका विहिरीत आढळून आला.
प्रदीप ६ दिवसापूर्वी दवाखान्यात जातो, असे सांगून गेला होता. दोन दिवसांनी कुटुंबाने नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. त्याची पत्नी सविताने शुक्रवारी तालुका पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
तदनंतर सोमवारी त्याचा मृतदेह आढळून आला. बाबासाहेब पांडे (घुलेवाडी) यांच्या खबरी वरुन शहर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. प्रदीपच्या मागे आई, वडील, पत्नी, २ मुली असा परिवार आहे.