अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी नग्न करुन तरुणाचे मुंडके जाळले…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील राजूर येथे वाकी परिसरात एका 40 वर्षीय तरुणाला नग्न करुन त्याचा खून करण्यात आला. तर, मयत व्यक्ती कोण आहे याची ओळख पटू नये. यासाठी त्याचा चेहरा देखील जाळुन पुरावे नष्ट करण्यात आले.(Ahmednagar Crime News)

हा प्रकार दि. 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी वाकी पोलीस पाटलांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला आणि याबाबत माहिती दिली.

त्यानंतर, साबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि काही संशयित गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. संबंधित मयत व्यक्तीचा चेहरा जाळुन टाकला असून शेजारीच काही दारुच्या बाटल्या देखील सापडल्याचे बोलले जात आहे.

हा मृतदेह पोलिसांनी लोणी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. हा खून हा पुर्वनियोजित असून अगदी कोल्ड माईंडने केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

अद्याप पोलिसांच्या हाती सबळ कोणताही पुरावे लागला नसून या खुनाची उकल करणे राजूर पोलिसांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office