अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : गुप्तधनाच्या अमिषाने जिल्ह्यातील ‘त्या’ गडावर पुन्हा केले उत्खनन…!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking :आजही अनेक जुने वाडे,गढी या भागात गुप्त धन असल्याच्या अमिषापोटी अनेकदा अशा ठिकाणी बळी देणे, रात्रीच्यावेळी काहीतरी जादूटोणा करून गुप्तधन मिळवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याच्या घटना घडत आहेत.

मात्र चक्क किल्ल्यावरच गुप्तधनाच्या अमिषाने उत्खनन केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील पेडगाव येथील बहादुर गडावरील भग्नावस्थेत असलेल्या हमामखान्यात अज्ञातांनी गुप्तधनासाठी अनेक वर्षानंतर पुन्हा उत्खनन केले आहे.

पेडगाव येथील बहादुरगडाला मोठा इतिहास असून, हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य स्वाभिमानाचा साक्षीदार आहे. या किल्ल्याची बरीचशी पडझड झाली असली, तरी तटबंदीसह महालांचे अवशेष अजूनही आहेत.

काही वर्षांपूर्वी दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्यावर अनेकांनी गुप्तधनाच्या अमिषापोटी बेकायदेशीररित्या उत्खनन करण्यात आले होते.

त्यामुळे परत असे प्रकार होव ूनये म्हणून पुरातत्व खाते आणि शिवदुर्ग संवर्धन समितीने येथे गडपालांची नेमणूक केल्याने येथील असे प्रकार बंद झाले होते.

मात्र शनिवारी रात्री अज्ञातांकडून परत एकदा या किल्ल्यावरील राणी महालातील हमामखान्यात गुप्तधनाच्या अमिषापोटी बेकायदेशीररित्या उत्खनन करण्यात आल्याचे समोर आले आहे. उत्खनन करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office