अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ चार पोलीस निलंबित !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील सासर्‍याकडून जावयाचा खून, प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्य आरोपी सचिन काळे व बुंदी भोसले यांनी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता

बुंदी भोसले याने पोलिसांची नजर चुकवून पोबारा केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंढरीनाथ घोरपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मन्सूर अहमद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी दत्तात्रय शिंदे हे तिघे त्यांच्या बंदोबस्तासाठी होते.

यातील तिघे पोलीस बुंदी भोसलेच्या पाठीमागे धावले. याचा फायदा घेत दुसरा आरोपी सचिन काळे याने पलायन केले.

त्यामुळे आपली जबाबदारी धुडकावत कोणताही विचार न करता कामगिरीत चुकारपणा केल्याचा आरोप या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.

तसेच पोलिसांना दवाखान्यात घेवून जात असताना तालुका पोलीस ठाण्यात असलेले ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार भैलुमे यांनी कोणतीही नोंद डायरीला न केल्यामुळे बेजबाबदारपणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे

. पोलिसांनी त्यांच्या कामात बेजबाबदार, कामचुकारपणा आरोपीस पळून जाण्याची संधी दिली व कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका या चारही पोलिसांवर ठेवत पोलीस अधिक्षक़ अखिलेशकुमार सिंग यांनी निलंबीत केले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24