अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात दोघे ठार; एक जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर शहरातील दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अहमदनगरमधील प्रसिध्द मुर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय ६२ रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला

तर महापालिकेतील वाहन चालक प्रशांत प्रकाश पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भैरवनाथ यात्रेवरून अहमदनगरकडे परतत असताना चास- कामरगाव घाटात समोर चाललेल्या टेम्पोला कारची पाठीमागून जोरदार धडक बसली.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office