अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यात शनिवारी दि. ३० ऑक्टोबर दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. मालवाहू कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर डोळासणे येथील उड्डाणपुलाजवळ घडला. या अपघातात दीपक शिवाजी डोखे रा. माळवाडी ता, संगमनेर मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मालवाहू कंटेनर हा घारगावकडून संगमनेरच्या दिशेने शनिवारी दुपारी जात असताना डोळसने उड्डाणपुलाच्या पाठीमागे असताना
दीपक डोखे हा हा दुचाकीवरून माळवाडी वरून संगमनेरच्या दिशेने जात होता, पुलाजवळ आला असता कंटेनरने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वर थेट महामार्गावर फेकला गेला.
यामध्ये डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. डोळसणे महामार्गाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्दैवी घटनेने माळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.