अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग ! एक कोटी लाच प्रकरणातील फरार अभियंता वाघ अखेर ’असा’ झाला गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

महाराष्ट्रभर गाजलेले अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसी विभागातील एक कोटीचे लाच प्रकरणातील मुख्य आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मागील दहा दिवसांपासून फरार असणारा आरोपी वाघ मुंबईहून धुळ्याकडे जाताना पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला व नाशिकमध्येच त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणातील एक आरोपी सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड याला लाच घेतानाच रंगेहात जेरबंद करण्यात आले होते.

नेमकं काय होत प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने लाचलुचपतकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार या ठेकेदाराने

अहमदनगर येथील एमआयडीसीमध्ये 100 एम एम व्यासाची पाईपलाईन टाकली होती व या कामातील जवळपास 2 कोटी 66 लाखांचे बिल काढायचे बाकी राहिलेले होते.

तेव्हा या वाघ व त्याच्या पंटरने एक कोटीची लाच मागितली. व ती स्वीकारली देखील. अमित किशोर गायकवाड याला लाचलुचपत विभागाने सापळा लावून रंगेहात पकडले होते

फक्त मुख्य आरोपी वाघ मात्र फरार होता. तो देश सोडून बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. परंतु आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

न्यायालय हजर , विविध गोष्टींचा उलगडा
वाघ याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता परंतु त्यावर निर्णय होण्यापूर्वीच त्याला पकडलय. त्याला न्यायालयासमोर हजर देखील करण्यात आले आहे.

आता त्याच्याकडून अनेक मोठमोठ्या गोष्टींचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यात काही बडे लोक आहेत का याचाही खुलासा होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24