अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : पशुवैद्यकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव शिवारात खासगी पशूवैद्यक शंकर सोमनाथ गायकवाड (वय २६) यांचा शेतळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असून

या घटनेमुळे तालुक्यात एकाच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पेशाने पशुवैद्यकीय असलेले शंकर सोमनाथ गायकवाड हे आपल्या शेतात काम करत असताना

ट्रॅक्टर का आला नाही बघण्यासाठी शेजारील गट ३६ मध्ये असलेल्या शेतळ्यावर चढले असता अचानक तोल गेल्याने शेतळ्यात पडले त्यांच्या सोबत असलेल्या मुलाने आरडाओरडा केला असता

गावातील नागरिकांनी तळ्याबाहेर काढले व शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोपरगाव येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले आहे.

या घटनेबाबत परिसरात एकच खळबळ झाली असून सरपंच विकास मोरे यांच्या खबरी वरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Ahmednagarlive24 Office