अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचावरच केला रानडुकरांनी हल्ला

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News:नगर तालुक्यातील ससेवाडी येथील सरपंच चांगदेव बाबासाहेब ससे यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यामुळे गावात घबराटीचे वातावरण आहे. सरपंच ससे व माजी सरपंच दत्तात्रय जरे त्यांच्या शेतातील कांद्याच्या रोपाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी तेथे अचानक रानडुक्कर आले. रानडुकराने सरपंच चांगदेव ससे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पायाला, हाताला तसेच डोक्याला जबर मार लागला आहे.

त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे ससेवाडी आणि परिसरातील वाड्या वस्त्यांवर घबराटीचे वातावरण असून शेतकरी शेतात काम करण्यासाठी जाताना घाबरत आहे. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office