अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जेसीबी व कारच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील अहमदनगर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर व  उपजिल्हाधिकारी संदीप निचीत हे जखमी झाले.

यात डॉ.क्षीरसागर यांच्या डोक्याला जबर मार लागला असून उपजिल्हाधिकारी निचीत किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना नगर-कल्याण महामार्गावरील नांदुरफाटा येथे घडली.

याबाबत सविस्तर असे की, नगरहून संगमनेर येथे नगर-कल्याण महामार्गाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र क्षीरसागर व उपजिल्हाधिकारी संदीप निचीत हे दोघेजण इन्होवा कारने जात होते त्यांची कार आणे शिवारात नांदुरफाटा येथे आली असता जेसीबी अचानक महामार्गावर आला.

त्यामुळे  कारची धडक जेसीबीला बसली. या अपघातात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांचे डोक्याला मार लागला असून त्यांना आळेफाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24