अहमदनगर बातम्या

बनावट पदव्या देणाऱ्या अहमदनगरमधील संस्थचा भांडाफोड, पुण्यात गुन्हा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News:संस्थेची अधिकृतपणे नोंदणी नसताना पैसे घेऊन अभियांत्रिकीच्या बनावट पदव्या देणाऱ्या अहमदनगर शहरातील एका संस्थेची पुण्यातील शिक्षकाने भांडाफोड केली आहे.

या संस्थेविरूद्ध पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहमदनगरमधील भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यावसाय प्रबंधन अध्यायन संस्था, युथ आयकॉन्स हेडक्वाटर्स, नगर-औरंगाबाद रोड यासंसथेची जाहिरात पाहून पुण्यातील शिक्षक अभिषेक सुभाष हरिदास (रा कोथरूड) यांनी संपर्क केला.

त्यांना बी.ई इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी हवी होती. त्यासाठी चौकशी केली असता संस्थेने त्यांना बी.ई. पेक्षा थेट डॉक्टर इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी घेण्याची ऑफर दिली. पाचशे रुपये भरून प्रवेश घ्यायचा, त्यानंतर कोर्सनुसार ७० हजार ते अडीच लाखापर्यंतची रक्कम भरायची. त्यानंतर संस्था मागील तारखेची हवे ते प्रमाणपत्र देणार असा हा उद्योग होता.

ही फसवणूक अल्याचे लक्षात आल्यावर हरिदास यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली असता संस्थेला कोणताही परवानगी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संस्थेविरूद्ध तसेच संस्थेशी संबंधित साबील सय्यद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office