अहमदनगर बातम्या

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News: अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहीनी (११०० एम.एम.) शिंगवे गावाजवळील देव नदीत पाण्याच्या हवेच्या दाबाने बुधवारी लिकेज झालेली आहे.

सदर जलवाहीनी दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतलेले आहे. परंतु जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने दुरुस्तीस अवधी लागणार आहे. दुरुस्ती कालावधी दरम्यान शहरात पाणी येऊ शकणार नाही व त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही.

परिणामी गुरूवार दि. १० रोजी दुपार नंतर पाणी वाटप असलेल्या स्टेशन रोड परिसर, विनायक नगर, कायनेटीक चौक परिसर इ. भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार असुन तो दि. ११/११/२०२२ रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल.

तसेच शुकवार दि. ११ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा सिद्धार्थ नगर, लालटाकी,दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगांव, कापड बाजार, आनंदी बाजार, नवीपेठ, माणिक चौक इ. भागास पाणी पुरवठा बंद राहणार असून या भागास शनिवार दि. १२ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल.

त्याचप्रमाणे शनिवार दि. १२ रोजी रोटेशन नुसार शहर पाणी नुसार शहर पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागास मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर,

सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहाणार असुन तो रविवार दि. १३ रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल. तरी नागरीकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. असे आवाहन महानगरपालीकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office