अहमदनगर शहर

अहमदनगरमध्ये महिलांचे मंगळसूत्र चोरण्याची नवी पद्धत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- सकाळी पायी फिरायला गेलेल्या एकट्या महिलेला गाठून रस्त्याने धावत येत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळून गेला.(Mangalsutra thief)

नगर-पुणे रस्त्यावरील विनायकनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी निर्मला सदाशिव भोळकर (वय 49 रा. विनायकनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

निर्मला भोळकर या विनायनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक भवनकडे जाणार्‍या रस्त्याने पायी निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून एक तरूण धावत आला.

त्याने अंगात जर्किंन व डोक्यात चेहरा झाकला जाईल, अशी टोपी घातली होती. तो धावत होता. त्यामुळे तोही व्यायाम करण्यासाठी आला असावा, असा भोळकर यांचा समज झाला.

काही क्षणात तो त्यांच्याजवळ आला. त्यांना धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. तेव्हा त्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले.

दरम्यान नगर शहरामध्ये दुचाकीवरून धूम स्टाईलने येत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र, मंगळसूत्र चोरांनी आता आपली पद्धत बदलली असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

Ahmednagarlive24 Office