अहमदनगर शहर

घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई…37 टाक्या जप्त

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- शहरातील नालेगांव अमरधाम शेजारी असलेल्या ठिकाणी विनापरवानगी व अवैधरित्या घरगुती गॅसटाक्यातून रिक्षामध्ये गॅस मशिनच्या साहायाने भरत असतांना जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने पकडले.

या छाप्यामध्ये37 घरगुती वापराच्या गॅस टाक्या व दोन इलेक्ट्रीक वजन काटे जप्त करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे नालेगांव अमरधाम शेजारी असलेल्या ठिकाणी विनापरवानगी व अवैधरित्या घरगुती गॅसटाक्यातून रिक्षा या वाहनांमध्ये गॅस मशिनचे साहायाने भरत असतांना पथकास आढळून आले.

पथकाने निलेश गोविंद आरडे (रा. गरवारे चौक, एम.आय.डी.सी. अ नगर) व विकास नारायण खोसे यांनी ठिकाणी दोन बंद असलेल्या रिक्षा मध्ये प्रेशर पंप मोटार च्या साह्याने गॅस रिफीलींग घरगुती वापराच्या टाक्याधून गॅस काढून अवैधरित्या रिक्षामध्ये भरतांना आढळून आले.

याप्रकरणी रिक्षा चालक अफरोज शेख,, राजु औशिकर, गणेश औशिकर, यांचा जबाब घेतला आहे. या ठिकाणी भारत गॅस कंपनीच्या रिकाम्या 18 व भरलेल्या 19 अशा एकूण 37 घरगुती वापराच्या गॅस टाक्या व दोन इलेक्ट्रीक वजन काटे आढळून आल्या.

त्यांचा पंचनामा पंचासमक्ष व पथकासमक्ष केला आहे. बेकायदेशिररित्या विनापरवानगी अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधून गॅस रिफीलींग करुन मशिनद्वारे रिक्षा या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचे निदर्शनास आल्याने निलेश गोविंद आरडे (रा. गरवारे चौक, एमआयडीसी अ.नगर) व विकास नारायण खोसे (रा. एमआयडीसी अ.नगर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office