अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालया मध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून कोविड वार्ड मध्ये उपचार घेत असलेल्या
१७ रुग्णांपैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता ही घटना घडल्यानंतर सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनल्स वर ही बातम्या प्रसारित झाल्या
याबाबत जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्याला या घटने बाबत विचारण्यासाठी नाशिकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन केला होता त्यावेळी जिल्हारुग्णालयातील त्या जबाबदार अधिकाऱ्याने थेट हा प्रकार एका जखमी इसमाने केला
असल्याचं सांगितलं रेल्वे मधून पडून जखमी झालेल्या एका इसमास रेल्वे पोलिसांनी जिल्हा रुग्णलयात दाखल केले होते त्याला कोविड सदृश लक्षणे आढळल्याने त्याला कोविड वार्ड मध्ये ठेवण्यात आले होते
आणि त्याने स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला त्या मुळे आग लागली असून त्याने याआधीही सुसाईडचा प्रयत्न केला होता अशी धक्कादायक आणि खोटी माहिती दिली
याबाबत नाशिकचा त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईला ही माहिती पुरवली मात्र जेव्हा नगरमध्ये पोलीस प्रशासन आणि इतर अधिकाऱ्यांना याची विचारणा झाली तेव्हा सत्य समोर आले आणि त्या जबाबदार अधिकाऱ्याचा खोटेपणा पुन्हा समोर आला
११ जणांचा बळी घेणाऱ्या आणि हलगर्जीपणा करणाऱ्या त्या अधिकार्यावर निलंबनाची कारवाई का करत नाही असा सवाल मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे