Ahmednagar Kopardi News : 13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोपर्डी गावात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. दरम्यान याच अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण देशभर गाजलेल्या कोपर्डी गावात मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, तसेच सदर युवकाला लग्न करून मारहाण देखील करण्यात आली.
विशेष म्हणजे हा तरुण 2016 मध्ये कोपर्डीत जी घटना घडली त्या घटनेतील एका आरोपीचा नातेवाईक आहे. कोपर्डी घटनेतील ज्या आरोपीने पुणे येथील येरवडा कारागृहात आपले जीवन संपवले होते आत्महत्या केली होती त्या जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याचा हा तरुण चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान जातिवाचक शिवीगाळ आणि नग्न करून मारहाण केल्याच्या प्रकारामुळे सदर पीडित तरुणाने गुरुवारी आत्महत्या केली असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी तीन लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांमध्ये एक कोपर्डी अत्याचाराच्या घटनेत पीडित मुलीचा नातेवाईक आहे.
यामुळे या प्रकरणाची सध्या संपूर्ण नगरभर चर्चा पाहायला मिळत आहे. विठ्ठल उर्फ नितीन कांतीलाल शिंदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात मयत व्यक्तीचे वडील कांतीलाल गोपाळ शिंदे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली आहे. यात असे नमूद करण्यात आले आहे की, एक मे ला कोपर्डी मध्ये यात्रा होती.
यात्रेनिमित्ताने आयोजित तमाशा मध्ये भांडणे झाली व त्यावेळी दिनेश उर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक आणि वैभव मधुकर सुद्रिक या तिघांनी आपल्या मुलाला नाचण्याच्या कारणांवरून मारहाण केल्याचे गुरुवारी समजले असल्याचे सांगितलं आहे. नंतर मग या पीडित तरुणाच्या वडिलांनी मुलाच्या शोधात त्याचे घर गाठले.
मुलाच्या घरी गेल्यावर मुलाच्या पत्नीने तो रात्रीपासून घरी आला नसल्याचे सांगितले. थोड्या वेळाने मग पीडीत तरुणाच्या लहान भावाचा, शांतीलालचा फोन आला अन विठ्ठल नग्न अवस्थेत स्मशानभूमीत असल्याचे त्याने सांगितले. मग घरून कपडे पाठवून त्याला घरी आणले गेले. यावेळी त्याने तमाशात नाचलो म्हणून मला वरील तिघांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
तसेच घरी येत असताना मारहाण करत स्मशानभूमीत नेऊन नग्न केले. आपणाकडील कपडे, मोबाइल सगळे काढून नेले. त्यामुळे मला घरी येता आले नाही. या अपमानामुळे माझी जगण्याची इच्छा नाही असं विठ्ठल बोलत होता. यामुळे त्यावेळी मी व जावयाने त्याची समजूत काढली असल्याचे मयत व्यक्तीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर काल अर्थातच दोन मे 2024 ला विठ्ठल याने आपल्या चुलत्याच्या घरात म्हणजेच बाबूलाल गोपाळ शिंदे यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकिस आले. त्यावेळी मयत व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी आढळली असून यामध्ये बंटी बाबासाहेब सुद्रिक व स्वप्नील बाबासाहेब सुद्रिक यांची नावे आहेत, असं देखील मयत तरुणाच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यातील एकजण हा पोलिसांनी ताब्यात देखील घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या तिघांमध्ये 2016 च्या कोपर्डी अत्याचाराच्या घटनेतील मृत पीडित मुलीचा नातेवाईक देखील आहे. स्वप्निल बबनराव सुद्रिक हा 2016 मध्ये झालेल्या घटनेतील पीडित मयत मुलीचा नातेवाईक असल्याचे सांगितले गेले आहे.