अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहरात चोर्या, घरफोड्या करणार्या दोघांना अटक करण्यात तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला यश आले आहे.
गणेश देविदास नल्ला (वय 23 रा. श्रमिकनगर, नगर), शैलेश दत्तात्रय फाटक (वय 20 रा. जिमखाना ग्राउंड समारे, एमआयडीसी) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून एक हजार 400 रूपयांची रोख रक्कम, एक चोरीची दुचाकी, चार मोबाईल, चांदीचा शिक्का असा 69 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरून एका महिलेकडील पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरली होती. 7 डिसेंबरला घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
सीसीटीव्हीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेले संशयीत वाहन एमआयडीसी परिसरात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. याठिकाणी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलस उपनिरीक्षक समाधान सोळंके,
पोलीस अंमलदार शैलेश गोमसाळे, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, धिरज खंडागळे, चेतन मोहीते यांच्या पथकांनी सापळा लावून नल्ला व फाटक यांना 24 तासांत ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करीत आहे.