अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- येथील कु.अश्विनी सुरेंद्र शिंदे हीस नॅनो टेक्नॉलॉजीचा अॅन्टी कॅन्सरमध्ये उपयोग या विषयाच्या प्रबंधाला मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली असून, तिला डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.
कु.अश्विनी हीचे मुंबईच्या भाभा विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ.विजय मेंढूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये हा रिसर्च पूर्ण केला आहे.
तिचे संशोधन कॅन्सर जागीच नियंत्रित करण्यात एक पाऊल, असे समजण्यात येते. याबाबतचे तिचे शोध निबंध अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
सध्या कु.अश्विनी अग्रगण्य आयआयटी व पुढील प्रोजेक्टवर काम करत आहे. रिसर्च मध्येच करिअर करण्याचा तिचा मानस आहे.
कु.अश्विनी हीचे शालेय शिक्षण नगरच्या ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तर पदवी शिक्षण न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये झालू असून, एम.एससी. अहमदनगर कॉलेज येथून झाले आहे.
कु.अश्विनी ही नगरमधील उद्योजक व चाणक्य नेट स्टडीचे संचालक सुवेंद्र व सौ.उमा शिंदे यांची ज्येष्ठ कन्या आहे.