अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीसांनी दुचाकी चोरी करणा-या दोघांना जेरबंद केले आहे. दिपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता.आष्टी, जि.बीड), राहुल छगन काळे (रा. अंभोरा ता.आष्टी जि.बीड) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर अक्षय सुनिक काळे (रा. चिचोंडी पाटील ता. नगर जि. अहमदनगर) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबतची माहिती अशी की, बबन फकीरा मोकाटे ( रा. इमामपुर पोस्ट जेऊर ता. नगर जि. अहमदनगर)
यांनी 10 हजार रू किंमतीची दुचाकी सी टी डिलक्स ( युपी .32 .डीयु. 6122) निळ्या रंगाची ही चोरीस गेल्याबाबत भिंगार कॅम्प पो स्टे ला फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्यातील गेलेला माल हा अंभोरा पोस्टे जि. बीड येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने सपोनी शिशिरकुमार देशमुख यांनी पोलीस पथक रवाना केले.
पोलिसांनी घटनास्थळी जात दुचाकी ताब्यात घेऊन गुन्ह्यातील आरोपीची अधिक माहीती घेतली. हा गुन्हा दिपक दिलीप साके, राहुल छगन काळे,
अक्षय सुनिक काळे यांनी केला असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहे.