21 जुलैपर्यंत भिंगार राहणार बंद; ‘हे’ आहे कारण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बरेच दिवस कोरोनमुक्त राहिलेले नगर शहरात मागील काही दिवसांपासून झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत.

तसेच भिंगार शहरही बराच काळ कोरोनमुक्त राहिले. परंतु आता भिंगार शहरातही कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची साखळी वाढू लागली आहे. गवळीवाड्यात कोरोना बाधित सापडल्याने हा भाग कॅन्टोमेंट बोर्डाने कंटेनमेंट घोषित केला आहे.

त्यामुळे भिंगार आता 21 जुलैपर्यंत बंद असणार आहे. 30 जुन रोजी कॅन्टोमेंट बोर्डाने लोहार गल्ली, मुळे गल्ली व गवळीवाडा 14 जुलैपर्यंत कंटेनमेंट घोषित केला होता.

त्या बाजुचा सदर बाजार व उर्वरित भिंगार हे बफर झोन असल्याने तेथेही लॉक करण्यात आले. आज पुन्हा गवळीवाडा नव्याने कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे.

जुनी महाराष्ट्र बँक ते घर नंबर 390 पर्यंतचा परिसर हा कंटेनमेंट असणार आहे. त्याबाजुचा सदर बाजार व उर्वरित भिंगार हे बफर झोन करण्यात आले आहे.

21 तारखेपर्यंत हा कंटेनमेंट लागू असेल असे आदेश कॅन्टोमेंट बोर्डाचे सीईओ विद्याधर पवार यांनी काढले आहेत. पाथर्डी-नगर हायवे मात्र त्यातून वगळण्यात आला आहे.

कंटेनमेंटमधील किराणा दुकान, दूध, भाजीपाला विक्री, मेडिकलही बंद असणार आहेत. बफर झोनमध्ये काहीशी सवलत मिळणार आहे. कंटेनमेंटमधील लोकांना बाहेर ये-जा करण्यावरही प्रतिबंध करण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24