अहमदनगर शहर

मंत्री शंकरराव गडाखांविरोधात “वंचित”चा रस्ता रोको

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख हे राजकीय द्वेषातून वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय लक्ष्‍मण सुखदान यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आज पोलिस अधीक्षक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

आंदोलनात सहभागी झालेल्या वंचितच्या नेत्यांनी मंत्री गडाख यांच्यावर जोरदार टीका केली. तसेचआंदोलनादरम्यान झालेल्या भाषणातून वंचितच्या नेत्यांनी प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी यांच्या तसेच प्रशांत गडाख यांचे खासगी स्वीय सहायक प्रतीक काळे यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान काम करत असल्याने राजकीय द्वेषातून मंत्री त्यांना त्रास देत आहेत.

मंत्री गडाख यांच्याकडून सुखदान त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्री गडाख यांनी पदाचा गैरवापर करून सुखदान यांच्या कुटुंबावर दडपण आणत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला.

यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक चौकांमध्ये साडेबारा वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यामुळे औरंगाबाद, मनमाड, पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मंत्री गडाख यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजीमध्ये महिला होत्या.

Ahmednagarlive24 Office