अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- नगर जिल्ह्यासह शहरात देखील गुन्हेगारी वाढू लागली आहे. नुकताच असाच एक प्रकार समोर आला आहे. पाईपलाईनरोड सावेडी उपनगरात एका घरात घुसून
बळजबरीने महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी शंकर येमूल याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरामध्ये असताना शंकर येमूल हा बळजबरीने त्यांच्या घरात घुसला.
त्याने फिर्यादीचा उजवा हात धरून त्यांना त्याच्याजवळ ओढले व त्यांच्यासोबत गैरवर्तन करून तेथून निघून गेला,असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग करणारा शंकर येमूल याच्याविरोधात फिर्याद दिली.पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान अशा घटनांमुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.