अहमदनगर :- वाडिया पार्क जिल्हा क्रिडा संकुलातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्य, अहिंसेचे पुजारी म्हणजे महात्मा गांधी. गांधीजींनी ब्रिटीशांच्या पोलादी ताकदीला अहिंसेने उत्तर दिले. स्वातंत्र्य प्राप्तीत महात्मा गांधीजींचे योगदान म्हणजे ज्या सुर्याने आपल्याला प्रकाश दिला, त्या सूर्याच्या स्मृतीला अभिवादन करणे होय, असे शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी यावेळी नमूद केले.
अभिवादन प्रसंगी पदाधिकारी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष फिरोज शफी खान, महिला अध्यक्षा सविता मोरे, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, प्रदेश महिला सदस्या सुनिता बागडे, प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर, सरचिटणीस मुकुंद लखापती, भिंगार महिला अध्यक्षा मार्गारेट जाधव, सेवा दल अध्यक्ष केशव मुर्तडक, नामदेव गुंजाळ, अभिजित कांबळे, अरुण धामणे, रजनी ताठे, सुभाष रणदिवे, अजहर शेख, रुपसिंग कदम, एम.आय.शेख, वसिम सय्यद, रवी सूर्यवंशी आदि उपस्थित होते.