सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसचे महाजीवनदान अभियान सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आज महाजीवनदान अभियानाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले असल्याचे, प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व असा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने अर्पण ब्लड बँक याठिकाणी आयोजन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, काँग्रेसचे प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी स्वतः रक्तदान करून या अभियानाचा शुभारंभ केला.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, प्रा.चंदनशिवे, नाथाभाऊ आल्हाट, एस. सी. काँग्रेसचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, प्रशांत वाघ, महिला काँग्रेसच्या डॉ.जाहिदाताई शेख, डॉ.रिजवान अहमद, सेवादल विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, युवक काँग्रेसचे विशालभाऊ कळमकर, विद्यार्थी काँग्रेसचे चिरंजीव गाढवे, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबूज, बबलू भिंगारदिवे, बंटी तिजोरे, पंकज साठे, सनी भिंगारदिवे,

इम्रान भाई बागवान, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे आदी उपस्थित होते. यावेळी महिला काँग्रेसच्या डॉ.जाहिदाताई शेख यांनी महिला, युवती, युवक यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे महिला काँग्रेसच्या वतीने आवाहन केले.

महाजीवनदान अभियान जिल्हाभर राबविणार ———————- आज नगर शहरातून सुरू झालेले हे अभियान प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली २० डिसेंबर पर्यंत नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जिल्हा काँग्रेस, युवक, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, सेवादल, महिला काँग्रेस यासह सर्व सेल, फ्रंटलच्यावतीने जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेस, एन.एस.यु.आयचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी सांगितले आहे.

या अभियानामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी, युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24