अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालय येथील कोविड अतिदक्षता विभागाला (ICU) शनिवारी लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्ण मयत झाले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुनिल पोखरणा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy S P संदीप मिटके हे करीत आहेत.
दरम्यान नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर सिव्हिल सर्जन यांच्या कामावर आक्षेप घेण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तक्रारी केल्या आहेत.