अहमदनगर शहर

अहमदनगर शहरातील खड्ड्यांप्रश्नी मनपाचे भावनिक आवाहन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर सामान्य नागरिकांच मनपावर रोष वाढलेला आहे. शहरातील विदारक अवस्थेचे चित्रण विविध माध्यमातून चर्चेत आले आहे.

पण आता मनपा प्रशासनाने एक निवेदन जारी करून भावनिक आवाहन करत खड्डे का पडले याची कारणे दिली आहेत. परंतु,

कारणे दिल्याने नगरकरांचा त्रास कमी होणार नसल्याने मनपा आता शहर खड्डेमुक्त केव्हा करणार या प्रश्नावर शहरात चर्चा सुरू आहे.

नगर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत मनपात मोठी आंदोलने होत आहेत, नागरिकही आता संताप व्यक्त करत आहेत.

नगर शहरातील भुयारी गटार, फेज दोनची कामे वर्षानुवर्षे संथ गतीने सुरू आहेत. नगरकरांच्या पैशातून उभारलेले रस्ते खोदाईची परवानगी मनपाकडून दिली जाते.

त्याचे खोदाई शुल्कही मनपाकडून वसूल केले जाते. पण या शुल्कातून तातडीने दुरूस्ती न करता नगरकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. ढिम्म कारभार सामान्य जनतेची फसवणूक नाही का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24