अहमदनगर शहर

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी रविवार, 19 रोजी मतदान झाले असून अडीच हजाराहून अधिक सभासदांपैकी 2 हजार 313 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.(Counting of votes elections)

दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली आहे आता लक्ष लागले आहे ते मतमोजणीकडे होय. या निवडणुकीसाठी आज सोमवार रोजी मतमोजणी होणार असून कर्मचारी सोसायटीवर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

दरम्यान झेडपी कर्मचारी सोसायटीची आधी तिरंगी होणारी निवडणूक ऐनवेळी गणेश पॅनलने माघार घेतल्याने दुरंगी झाली. सत्ताधारी मंडळाने जय श्री गणेश मंडळाच्या माध्यमातून निवडणूक लढवली.

तर विरोधी पवन मंगलमूर्ती पॅनलने त्यांना आव्हान दिले. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यात 15 ठिकाणी मतदानाला सुरूवात झाली.

यात 14 तालुक्यांची ठिकाणे यासह मुख्यालय एक या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया झाली. यात सकाळी 8 ते 10 या वेळेत तब्बल 2 हजार 313 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान या निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदान हे संगमनेरला 98 टक्के झाले. तर सर्वात कमी मतदान हे श्रीगोंद्यात 86.49 टक्के झाले. आज सकाळी नगरमधील पटेल मंगल कार्यालयात मतमोजणी होणार असून त्यानंतर लगेच निकाल जाहीर होणार आहे.

Ahmednagarlive24 Office