अहमदनगर :- बोल्हेगाव येथील शंभुराजे चौकात चौकीदाराचे काम करणाऱ्यास मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.
भैरवनाथ अण्णा शिंदे असे मारहाण झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.
शिंदे हे घरासमोर झोपलेले असताना अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ केली. जवळच पडलेले लाकडी दांडके घेऊन शिंदे यांच्या डोक्यात मारले.
तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक हारूण मुलानी यांनी घटनास्थळी भेट दिली.