अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- एटीएम मधून काढलेली रक्कम व एटीएम कार्ड चोरट्याने हात चलाखीने चोरले. नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनी चौकातील एटीएममध्ये ही घटना घडली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दादासाहेब किसन सातपुते (वय 31 रा. बहिरवाडी, बायजाबाई जेऊर, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी बुधवारी रात्री 11 वाजता तीन हजार 900 रूपये काढले.
त्याच वेळेस जवळ असलेल्या एका व्यक्तीने हातचलाखी वापरून त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि एटीएम कार्ड असा ऐवज चोरला. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक आंधळे करीत आहे.