अहमदनगर शहर

आई शप्पथ!! नुकसान पाचशे झाडांचे अन भरपाई फक्त एकाच झाडाची!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  बायपासमध्ये गेलेल्या १२ गुंठे शेत जमिनीतील साडेपाचशे झाडांऐवजी अवघ्या एका झाडाचे पैसे देऊन प्रशासनाने शेतकऱ्याची चेष्टा केली आहे.

याविरुद्ध आवाज उठवूनही उपयोग होत नसल्याने हतबल होत त्या शेतकऱ्याने चक्क भूसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. माहिजळगाव येथील शिवाजी अजिनाथ शेटे यांची अवघे १२ गुंठे नावावर असलेली जमीन रस्ता बायपासने होणार असल्याने या वळणावर पूर्णत: अधिग्रहनात गेली.

शेटे यांनी ३० शेळ्यांचे शेळी पालन केले होते, त्या शेळ्यांसाठी आपल्या नावावर असलेल्या १२ गुंठे जागेत सुबाभुळीच्या पाचशे झाडांची लागवड केली होती.

सदर लागवडीची नोंद शासकीय कागदपत्रात पूर्वीच केलेली होती. याशिवाय रस्त्याच्या नकाशात या झाडाचा नेमका उल्लेख दिसत असताना या शेतकऱ्याला अवघ्या एका झाडाचे पैसे नुकसान भरपाई म्हणून मिळाले असून.

या बाबत शेटे यांनी तलाठ्या पासून प्रांताधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयात पत्रव्यवहार करून चकरा मारून ही उपयोग होत नसल्याने व डोक्यावर पाणी वाहून जगवलेली झाडाची नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेरीस शिवाजी शेटे यांनी आपल्या शेतातच भुसमाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला असून, यामुळे खळबळ माजली आहे.

Ahmednagarlive24 Office