अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गिरीश सुनील वरकड (रा. बुरूडगाव रोड, नगर) या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दरम्यान अधिक माहिती अशी कि, गिरीश वरकड याला सदरची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्याने स्नॅप चॅट अॅपवर तिच्याशी ओळख करून मोबाईलच्या माध्यमातून वेळोवेळी फोन करून, मिस कॉल व मेसेज करून तिचा छुपा पाठलाग केला.
तसेच तिला हातवारे करून तिच्याशी गैरवर्तन केले. ती कुठे आहे, माझे तिच्यावर प्रेम आहे. तिला नगरला आणले नाही, तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकीन, अशी मला धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.