अहमदनगर शहर

नवीन एलईडी दिव्यांचा जुन्या दिव्याप्रमाणे प्रकाश पडवा …अन्यथा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- जुन्या दिव्यांप्रमाणे आत्ताच्या एलईडी दिव्यांचा प्रकाश द्यावा. याच बरोबर दोन-अडीच महिन्यांमध्ये शहरातील सर्व पथदिवे बसवावे अन्यथा कारवाई केली जाईल.

असा इशारा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी संबंधित ठेकेदाराला दिला. नगर शहर अनेक वर्षांपासून पथदिव्याच्या प्रतीक्षेत होते.

खासगी एजन्सीला पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरवात झाली परंतु कमी प्रकाश पडत असल्यामुळे नगरसेवक व नागरिकांनी प्रकाशा बाबत तक्रारी केल्या.

याच पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी पथदिवे बसवण्याच्या संदर्भात बैठक बोलावून संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या.

यावेळी आयुक्त गोरे यांनी संबंधित ठेकेदार एजन्सीला सांगितले की, शहरात बसविण्यात येणाऱ्या पथदिव्यांचा करारनामा नुसारच काम सुरू करावे, शहरामध्ये पथदिवे बसवण्याचा कालावधी चार महिन्याचा तुम्हाला दिला आहे

त्यामधील दीड महिन्याचा कालावधी संपुष्टात आला आहे आता अडीच महिन्यामध्ये सर्व पथदिवे शहरांमध्ये बसवून जुन्या दिव्यांन प्रमाणेच नवीन एलईडी दिव्यांचा प्रकाश असावा

संबंधित काम झाल्यानंतर त्या भागातील नगरसेवकांच्या निदर्शनास केलेले काम आणून द्यावे.याच बरोबर शहरातुन सात राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत

यावरती ही केंद्राच्या नियमाप्रमाणे पथदिवे बसवून नगर शहर प्रकाशमय करावे,या सात महामार्गांची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे असे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office