अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यातच नगर मध्ये देखील बस कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहे.
याप्रश्नी नुकतेच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान एसटी कामगार संपाच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करण्यात यावा तसेच शहरातील तारकपूर, माळीवाडा तसेच स्वस्तिक चौक बसस्थानक या तीनही बसस्थानकांना बांधा-वापरा-हस्तांतरित करा(बीओटी) तत्वावर आधुनिक पध्दतीने विकसित करण्याबाबत निवेदन देत सविस्तर चर्चा केली.
राज्यभर सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलन मिटण्याची चिन्ह अजून दिसत आसून सरकार एसटीचे विलीनीकरण करण्यास अद्याप तयार नसल्याचे दिसून येत आहे.
या सर्व परिस्थिती बाबत आ.संग्राम जगताप यांनी परब यांच्याशी चर्चा करून लवकर मार्ग काढण्याची विनंती केली. तसेच नगर शहरात असलेल्या तारकपूर,
माळीवाडा आणि स्वस्तिक चौक या तीन बस स्थानकांचे बीओटी तत्वावर विकसित करावेत अशी मागणी केली.
अनिल परब यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी आ.जगताप यांना दिली.