अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- शहरात कोराना रूग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेच्या कोरोना दक्षता पथकाकडून अधिक कडक कारवाई करण्यात येत आहे.
सोमवारी या पथकाने बालिकाश्रम रोडवरील ज्ञानप्रबोधिनी लक्ष अॅकॅडमीविरोधात दंडात्मक कारवाई केली. विद्यार्थी आणि शिक्षकांकडून सुमारे आठ हजार रूपयांचा दंड वसूल केला.
शहरासह जिल्ह्यात करोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अहमदनगर शहरात सोमवारी 359 रूग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले.
गेल्या 10 दिवसांपासून अहमदनगर शहरात करोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेने करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात करोना दक्षता पथकाकडून कारवाईस सुरूवात केली आहे.
या पथकाने सोमवारी बालिकाश्रम रोड येथील ज्ञानप्रबोधिनी लक्ष अॅकॅडमी येथे भेट दिली. तिथे काही विद्यार्थी व शिक्षक हे विनामास्क आढळले.
त्यामुळे तेथे 16 विद्यार्थी व शिक्षक यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईत सुमारे आठ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.