महिलेस खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : महिलेस तिच्या प्लॉटमध्ये येण्यास मज्जाव करून सात-आठ जणांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पंधरा लाख रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास प्लॉट खाली करणार नाही, अशी धमकी दिली.

ही घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील ढवणवस्ती येथे दि.३ जुलै ते २७ सप्टेंबर दरम्यान चार वेळा घडली.. याबाबतची माहिती अशी की, यमुनाबाई राधाकृष्ण सांगळे (वय ५९, रा. गुलमोहर रोड, अ.नगर) यांच्या पतीच्या नावाने असलेला ढवणवस्ती येथील प्लॉट हा पतीच्या निधनानंतर यमुनाबाई सांगळे व तिच्या मुलांच्या नावाने वारस हक्काने नोंदणी झाला.

परंतु यमुनाबाई या प्लॉटवर गेल्या असता त्यांना स्वप्नील अशोक ढवण, अजिंक्य अशोक ढवण, सुनील अशोक ढवण (सर्व रा. ढवणवस्ती) व इतर चार- पाच अनोळखी इसमांनी प्लॉटमध्ये पाय ठेवायचा नाही, असे म्हणुन धमकी दिली व पाच लाखाची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर प्लॉट खाली करणार नाही, असे म्हणुन ठार मारण्याची धमकी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24