राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकास अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक समद खान याला गुरुवारी पहाटे भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. खान मुकुंदनगर येथे घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले.

गेल्या महिन्यात मोहरम व गणेशोत्सवामुळे शहरातून तीनशेहून अधिक गुन्हेगारांना शहरबंदी करण्यात आली होती. त्यात खानचा समावेश होता. शहरबंदी असताना खान मुकुंदनगरमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर धक्काबुक्की करून तो मोटारसायकलवरून पसार झाला होता.

या प्रकरणी मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल झाला होता. या गुन्ह्यात खान फरारी होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. खान त्याच्या घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुकुंदनगर येथे सापळा रचून त्याला अटक केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24