अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणार्या नागरिकांना तोंडावर मास्क लावूनच यावे लागणार आहे. कारण, भिंगार कॅम्प पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवर ‘नो मास्क, नो कम्प्लेंट’ असा बोर्ड लावला आहे.
अहमदनगर शहरापाठोपाठ भिंगार शहरात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे भिंगारचे पोलीस दक्ष झाले असून पोलीस ठाण्यात येणार्या व्यक्तींना मास्क सक्तीचा केला आहे.
तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर मास्क नसल्यास त्याला प्रवेश नाकारण्यात येत आहे. करोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहे.
त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने रूग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात वाढत असलेल्या रूग्ण संख्येत सर्वांधिक रूग्ण अहमदनगर शहर व भिंगार उपनगरात आढळून येत आहे.
रविवारी भिंगार शहरात 55 व सोमवारी 61 बाधित समोर आले. यामुळे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येणार्या व्यक्तींना मास्क सक्तीचे करण्यात आले आहे.
नियमांचे पालन करण्यासाठी गेटवर बोर्ड लावण्यात आला आहे. या बोर्डवर ‘नो मास्क, नो कम्प्लेंट’ असा मजकूर लिहिला आहे.
एक प्रकारे तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात येणार्या व्यक्तीने कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे नागरिकही बोर्ड पाहून का होईना पोलीस ठाण्यात येताना तोंडावर मास्क लावून येत आहे.