बाजारतळावर खुलेआम हातभट्टी विक्री करणार्‍याला पोलिसांनी पकडले

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सावेडी उपनगरातील यशोदानगरच्या बाजारतळ परिसरात खुलेआम गावठी हातभट्टी दारूची विक्री करणार्‍याला तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पकडले.

विशाल अरूण शिंदे (वय 29 रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड, सावेडी) असे दारू विक्री करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून हातभट्टी दारू जप्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून हातभट्टीची विक्री करणार्‍याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाईपलाईन रोडवरील यशोदानगर कमानीजवळील बाजार तळावर एक व्यक्ती गावठी हातभट्टी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांना कारवाईचे आदेश दिले. उपनिरीक्षक सोळुंके यांनी सदर ठिकाणी पोलीस अंमलदार यांच्यासह छापा टाकला असता शिंदे हा गावठी हातभट्टी विक्री करत असताना मिळून आला. त्याच्याकडून दारू जप्त केली आहे.