अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- खासगी ट्रॅव्हल्स् एजंट अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. याचा अनुभव महापालिकेतील एका अधिकार्यांनाही आला.(crime of ransom)
त्यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चौघांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मनपाचे अधिकारी राहुल किशोर अहिरे (रा. बॉम्बे बेकरी समोर, मुकुंदनगर, मुळे रा. आनंदनगर ता. मालेगाव जि. नाशिक) यांच्या फिर्यादीवरून सेवा ट्रॅव्हल्स्चे एजंट अमीर फारूख खान (रा. जुना बाजार, नगर), सोफियान बागवान (रा. पंचपीर चावडी),
समशेर सलीम खान (रा. जुना बाजार, पंचपीर चावडी व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल आहिरे हे नगरहून जळगाव येथे जाण्यासाठी माळीवाडा परिसरातील सेवा ट्रॅल्हल्स्च्या कार्यालयासमोर गेले. ते तेथे उभ्या असलेल्या मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसले.
यावेळी चार इसमांनी त्यांना खाली उतरवले. चारशे रूपये तिकीट पडलेल, असे सुनावले. मात्र, आहिरे यांनी 250 रूपये तिकीट असल्याने मी तेवढेच पैसे देणार, असे म्हणाले असता त्या चार इसमांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.